Friday , March 6 2026
Breaking News

सफाई कर्मचार्‍यांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर!

Spread the love

बेळगाव : संपूर्ण बेळगावची स्वच्छता करणार्‍या सफाई कामगारांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून हा भाग पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे येथील निवासी मनपा अधिकार्‍यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
बेळगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनविणे हि बाब स्वप्नवतच आहे याचेच आणखीन एक उदाहरण म्हणजे स्वच्छता कामगारांचा निवासी परिसर. संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी सेवा वाजविणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांच्या निवासी भागातच पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आझम नगर येथील पी. के. क्वाटर्स परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता कामगार राहतात. या परिसरात रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पथदीप यासह अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच या परिसरात साप, मुंगूस आणि इतर किड्यांचाही प्रादुर्भाव वाढला असून या भीतीपोटी मुलांनाही बाहेर पाठविणे मुश्किल बनले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *