Sunday , December 14 2025
Breaking News

तवंदी घाटात भरधाव कंटेनरची कारला भीषण धडक; चार जण जागीच ठार

Spread the love

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास झाला. छाया आदगोंडा पाटील (वय 55 ), आदगोंडा बाबू पाटील (वय 55,) महेश देवगोंडा पाटील (वय 23,) चंपाताई मगदूम (वय 80) रा. बोरगाववाडी ता. निपाणी अशी मृत चौघांची नावे आहेत. कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या अपघाताची भीषणता इतकी होती की कंटेनरच्या धडकेत कारमध्ये अडकून पडलेल्या चार जणांना पोकलेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अपघातानंतर तासभर मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. अपघातातील मृत सर्वजण स्तवनिधी येथे मंगल कार्यालयात लग्नकार्यासाठी जात होते. अपघातामध्ये नवरी मुलगीच्या महेश या भावाचा समावेश आहे. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीएसपी बसवराज यलीगीर, सीपीआय संगमेश शिवयोगी उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहेसूर यांच्यासह अग्निशमन विभागाने भेट देऊन मदत कार्य सुरू केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *