Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगावात कन्नड साहित्य भवनात अज्ञाताचा गोंधळ

Spread the love

बेळगाव : बेळगावातील कन्नड साहित्य भवनातील महिला शौचालयात घुसुन रविवारी सकाळी एकाने चांगलाच गोंधळ घातला. त्याला बाहेर काढण्यासाठी भवनाचे कर्मचारी आणि पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.
आज सकाळी 7 च्या सुमारास भवनातील महिलांसाठी असलेल्या शौचालयात घुसून या बहाद्दराने आतून कडी लावली. काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नव्हता. भवनच्या कर्मचार्‍यांनी अखेर पोलिसांना बोलावले. मार्केट पोलीस आणि कर्मचार्‍यांनी त्या अज्ञाताला समजावून सांगत बाहेर येण्याची सूचना केली. त्यावर त्याने, पीएसआय येथे आले पाहिजे, मला संरक्षण दिले पाहिजे असे आतूनच सांगितले. त्यामुळे मार्केटचे पीएसआय विठ्ठल हावण्णावर यांनी घटनास्थळी येऊन त्याला बाहेर येण्याची सूचना केली. तरीही त्याने दाद दिली नाही. आपण कित्तूर तालुक्यातील खोदानपूरचा असल्याचे त्याने सांगितले. मात्र दार उघडून बाहेर आला नाही.
उलट शौचालयाची खिडकीची काच फोडली. त्यामुळे काही काळ विचित्र परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला, ‘तुला काही करणार नाही, तू बाहेर ये’ असे सांगत समजावले. त्यानंतर काही काळाने तो काचेचे तुकडे घेऊन बाहेर आला. त्यानंतर पोलीस त्याला मार्केट पोलीस स्थानकात घेऊन गेले आणि या विचित्र नाट्यावर पडदा पडला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *