बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयच्या वतीने गावातील शाळेत पै.रवळनाथ श्रीधर कणबरकर याचा सन्मान करण्यात
आला. रवळनाथ हा नुकताच हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन आला आहे.
बाबा भोलादास आखाड्यात दीड महिना सराव केला. सोनिपत खरकोदा येथील राष्ट्रीय पातळीवर कुस्ती कोच अशवनी दया यांच्याकडे त्याने प्रशिक्षण घेतले. भविष्यात एक उत्कृष्ट सातत्याने सराव करून नावाजलेला पैलवान होईल, अशी अपेक्षा वाय. पी. नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच तो सध्या सावगावमधील मठपती कुस्ती आखाड्यात सराव करीत आहे.
बालपणापासून कुस्ती खेळात, आवड निर्माण करून तरुणपिढीला एक आदर्श घालून दिलाआहे. तो इयत्ता सातवीत शिकत आहे.
त्याला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वाचनालयकडून रू. पाच हजार व गावातील ग्रामस्थ मंडळाचे सचिव कल्लाप्पा येळ्ळूकर यांच्याकडून पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेतल्याचा अभिमान गावाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta