बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शहर व तालुका म. ए. समितीच्यावतीने आवाहन केल्याप्रमाणे त्या-त्या वॉर्डातील पंच मंडळींनी एक उमेदवार सुचविला त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देऊन 21 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केली. आज पुन्हा वॉर्ड क्रमांक 30 मधून श्री. दयानंद दीनानाथ कारेकर व वॉर्ड क्रमांक 58 मधून सौ. रश्मी पवन काकतकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान पंच मंडळी, उमेदवार व सुज्ञ नागरिक यांच्या सल्ल्याने कांही वॉर्ड खुले सोडण्यात आले आहेत त्यामध्ये वॉर्ड 1, 3, 4, 5, 6, 7, 13, 18, 19, 22, 23, 27, 34, 35, 39, 41, 44, 47, 48, 49, 54 व 55 असे आहेत.
सुज्ञ नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ असणार्या उमेदवारांमध्ये एकी करण्याचा प्रयत्न करावा. एकी होत नसल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीची एकनिष्ठ राहून जनतेची कामे करणार्या मराठी उमेदवारास निवडून द्यावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी व तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
Check Also
उद्या बेळगावात होणारे सर्व कार्यक्रम रद्द
Spread the love बेळगाव : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगावात उद्या …