Friday , March 6 2026
Breaking News

सैन्यभरती परीक्षा तातडीने घ्या; माजी सैनिक संघटनेची निदर्शने

Spread the love

बेळगाव : सैन्यभरती परीक्षा घेतल्या जात नसल्याच्या निषेधार्थ अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेच्या वतीने बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. या परीक्षा तातडीने घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून भारतीय सैन्यात भरती होण्यासाठीची लेखी परीक्षा सरकारने घेतलेली नाही. सैन्यात भरती होण्याच्या इच्छेने बेरोजगार युवक परीक्षेसाठी बौद्धिक आणि शारीरिक तयारी करत आहेत. मात्र कोरोनासह या ना त्या कारणाने केंद्र सरकार परीक्षा पुढे ढकलत आहे. त्यामुळे इच्छुक युवकांची वयोमर्यादा उलटून जाऊन त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने सैन्यभरती परीक्षा घेण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. दोन वर्षांपासून कोरोना व अन्य कारणांमुळे सैन्यभरती परीक्षा न घेतल्याने इच्छुक उमेदवारांचे वय उलटून नुकसान होत आहे. आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे परीक्षा घेऊन संधी द्यावी, अशी मागणी निदर्शक माजी सैनिकांनी केली.
यावेळी बोलताना इच्छुक उमेदवारांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यात सैन्यात दाखल होण्यासाठी 4 हजारहून अधिक युवक इच्छुक आहेत. त्यासाठी घरीच राहून कसून सराव करत आहेत. परंतु भर्तीसाठीची परीक्षाच होत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भर्तीसाठीची वयोमर्यादा वाढवून लागलीच परीक्षा घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. या निदर्शनात बसाप्पा तळवार, इरण्णा हिरेमठ, कुमार पाटील, सुरेश यांच्यासह माजी सैनिक व सैन्यभरती इच्छुक उमेदवारांनी भाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *