Friday , March 6 2026
Breaking News

माळी गल्ली परिसरात डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण

Spread the love

बेळगाव : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त माळी गल्ली युवक मंडळ व शिवाई देवी महिला मंडळ यांच्यावतीने आयोजित डेंग्यू व चिकनगुनिया लसीकरण शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
सदर शिबिराचे उद्घाटन प्रभागाच्या नगरसेविका ज्योती राजू कडोलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. हेमंत भोईटे यांच्यासह युवक मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, प्रभाकर बामणेकर, संतोष हेब्बाळकर, भाऊराव चौगुले, अभिषेक पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुराधा चौगुले, उर्मिला ठोकणेकर, विणा मुळे, कल्पना ठोकणेकर, शीला भोसले, रेश्मा ठोकणेकर आदी उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये डॉ. हेमंत भोईटे यांनी माळी गल्ली परिसरातील स्त्री-पुरुष व मुलांना डेंग्यू -चिकनगुनिया लसीकरण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी गल्ली युवक मंडळ व शिवाई देवी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

कडोलीत उद्या मराठी भाषा गौरव दिवस

Spread the love  कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे शनिवार दि. 7 मार्च 2026 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *