Thursday , March 5 2026
Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील खुल्या जागेचा होणार सदुपयोग

Spread the love

बेळगाव : बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील खुल्या जागेत निदर्शन स्थळ, पार्किंग आणि खाऊ कट्टा उभारण्याची योजना असून, या संदर्भात आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी डीसीपी रवींद्र गडादी यांच्यासमवेत या परिसराची पाहणी करून चर्चा केली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बरीच जागा खुली आहे. परंतु तरीही कार्यालय आवारात पार्किंगची समस्या उदभवत आहे. गुटखा, तंबाखू खाऊन लोक या ठिकाणी अस्वच्छता निर्माण करत आहेत. हे टाळण्यासाठी एक योजना आखण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकाचवेळी अनेक निदर्शने, आदोलने होत असतात. अशावेळी मोठी गर्दी होऊन आंदोलकांना हाताळणे कठीण होऊन जाते. त्यामुळे कार्यालय आवाराजवळच निदर्शन-आंदोलनांची जागा निश्चित करून दिल्यास गर्दी कमी होईल. पार्किंग लॉट उपलब्ध करून दिल्यास जिल्हा प्रशासनाला महसूलही मिळणार आहे. त्याशिवाय वाहतुकीला सुलभ होऊन बेशिस्त पार्किंगला आळा बसणार आहे. एकंदर जिल्ह्यातून येणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी खुल्या जागेचा योग्य वापर करण्याची योजना आहे. त्यामुळेच येथील खोकी, दुकाने हटविण्यात आली आहे. याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *