बेळगाव : वायव्य शिक्षक मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले प्रकाश हुक्केरी यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपल्या विजयासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी विशेष सहकार्य केले असे म्हणत त्यांनी उभयतांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. नुकताच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चन्नराज यांना विजयी करण्यात आपण यशस्वी ठरले आहोत. यापुढील निवडणुकीत उमेदवारांना तुमचे नेतृत्व लाभत राहिल्यास पक्षाला उज्वल भवितव्य असेल,अशी प्रतिक्रिया आमदार हुक्केरी यांनी दिली. यावेळी मृणाल हेब्बाळकर हेही उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta