Saturday , September 21 2024
Breaking News

सृजनात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे : ज्येष्ठ विचारवंत अध्यक्ष श्री. आर. वाय. पाटील

Spread the love

दमशी मंडळ मंडळ बीके कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प, 25 जून रोजी बैठकीचे आयोजन
बेळगाव : कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम थांबले केले होते; ते पुन्हा नव्या दमाने चालू करून सृजनात्मक उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता कार्य करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि इतर सर्व दृष्टिकोनातून दमशी मंडळ संचलित बी. के. कॉलेजमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. तसेच प्राध्यापक कर्मचारी पालक विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढे येऊन नवनवे उपक्रम राबवण्यासाठी हातभर लावला गेला पाहिजेत तरच पुढील वाटचाल यशस्वी होऊ शकते. माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून दमशी मंडळ बी. के. कॉलेजच्या मार्फत अनेक विविध उपक्रम गेल्या पाच वर्षापासून चांगल्या पद्धतीने घेतलेल्या आहेत त्याचा संपूर्ण आढावा घेत वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटनांचे विश्लेषण करण्यात आले. कोरोनाच्या काळात सर्व उपक्रम थांबले याची खंत ही व्यक्त केली.
2019 साली घडलेल्या अचानक पूरग्रस्त नैसर्गिक आपत्तीमध्ये भरपूर नुकसान झाले होते; त्यासाठी पूरग्रस्त भागातील गावोगावी जाऊन जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून आर्थिक मदतही करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी विविध व्याख्याने, शैक्षणिक उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते; या वैश्विक महामारी मध्ये अनेक गोरगरीब कुटुंबाला आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात उपयोगी वस्तूंचे वस्तूंचे वाटप करण्यात आले असून कोरोणा विषयी जागृती अभियान राबविण्यात आले. मास्क वाटप, करून जागृती करण्यात आली. रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, भाषा संस्कृती परंपरा संवर्धन करण्यासाठी प्रयत्न, वनमहोत्सव, व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, परिवर्तनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे; यापुढेही अशा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा, पुढे यायला हवे आणि सर्वांच्या कल्याणाकरिता पुढे वाटचाल करायला हवी.
भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पुढे यायला हवे अनेक संकटांना मात करून सर्वांच्या हिताकरिता माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एक नवा समाज सुदृढ समाज आणि चांगल्या पद्धतीचे विचार नव्या पिढीला देण्याचे गरज असून हा आदर्श विद्यार्थ्यांमध्ये घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण पुढे यायला हवे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत श्री. आर. वाय. पाटील यांनी केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांच्या कार्यकारणीची बैठक बुधवार दिनांक 22 जून 2022 रोजी महाविद्यालयाच्या जिमखाना कै. मारुतीराव काकतकर सभागृहात बैठक घेण्यात आली.
त्या बैठकीचे अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत श्री. आर. वाय. पाटील होते.
बैठकीत व्यासपीठावर भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे, प्रा. नितीन घोरपडे, प्रा. एन. एन. शिंदे, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. बी.आय. वसुलकर , चार्टर्ड अकाउंटंट श्री. सुरेश बरगावकर उपस्थित होते.
स्वागत चार्टर्ड अकाउंटंट श्री. सुरेश बरगावकर व प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, आर. वाय. पाटील, प्रा. नितीन घोरपडे, प्रा. एस. एस. पाटील,. प्रा एन. एन. शिंदे , प्रा. निता पाटील यांनी वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता विचार मांडले.
सूत्रसंचालन प्रा. नारायण तोराळकर यांनी केले तर श्री. बी.जी. गाडेकर यांनी आभार मानले.
यावेळी श्रीमती के. के. पन्हाळकर, प्रा. दिलीप वाडेकर, प्रा. अमित सुब्रमण्यम, प्रा. जी जी. पाटील, प्रा. लक्ष्मण बांडगे, प्रा संजय बंड, प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे, प्रा. महादेव नार्वेकर, प्रा. रामभाऊ हुद्धार, अनिल पाटील, मनोहर हुंदरे, आनंद गोरल, ए. व्ही. सुतार, प्रा. विश्वास बामणे, दिपक पावशे, प्रा. योगेश मुतगेकर, प्रा. एस. आर. चव्हाण, प्रा. गुरुप्रसाद गुंजीकर, उदय पाटील, मनोज मोरे, यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—————————————————————–

दमशी मंडळ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची बैठक शनिवार दिनांक 25 जून 2022 रोजी दुपारी चार वाजता बोलविण्यात आलेली आहे. ही बैठक खुली असून महाविद्यालयाच्या जिमखाना सभागृहात घेण्यात येणार आहे तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून नवनवे उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. उपक्रम राबविण्यासाठी पाठबळ द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्य करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. महत्त्वाचे योगदान देऊन कृतिशील यशस्वी वाटचाल पुढे न्यावी. त्याकरिता नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यासाठी आपण वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात पॅलेस्टाईन राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे मंडप!

Spread the love  बेळगाव : कर्नाटक राज्याचे गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या वक्तव्याने प्रेरित होऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *