Saturday , June 14 2025
Breaking News

गायब आमदारापैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार – उद्धव ठाकरे

Spread the love

मुंबई : मला दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं….सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं….तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, असं तोंडावर सांगावं. ज्यांना मी नकोय, त्यांनी समोर येऊन सांगावं.. आज संध्याकाळपासूनच मी मुक्काम वर्षाहून मातोश्रीवर हलवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनाचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद आहे. फक्त मला हे समोरून येऊन सांगा. तुम्ही या…माझ्याशी बोला मग आपण बघू.”, बंडखोरीवर स्पष्ट बोलले मुख्यमंत्री.
सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर येऊन बोलायला हवं होतं. मी उठलो असतो, जर त्यापैकी एकाही आमदाराने मला समोर येऊन बोलले असते तर मी आताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहे. राजीनाम्याचं पत्र तयार करतो. आजच मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवतोय. मला कोणताही मोह नाही . फक्त माझ्या समोर येऊन बोला. यामुळे नुकसान कोणाचं होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ पवारांचा विश्वास. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला. कुऱ्हाडीची गोष्ट. ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.
एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

About Belgaum Varta

Check Also

साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

Spread the love  पुणे : ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *