
बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगांवच्या वतीने येत्या सोमवारी 27 रोजी इतर भाषेबरोबर मराठी कागदपत्रे देण्याच्या संदर्भात मुदत दिली होती ती मुदत संपली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये येळ्ळूर येथील सर्व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी, सेक्रेटरी श्री. प्रकाश अष्टेकर, इतर सदस्यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta