बेळगाव : उद्यमबाग येथील एक्सपर्ट लॉन आणि लॉज व्हिक्टोरिया (ब्रदरहुड) यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिर आज यशस्वीरित्या पार पडले.
शिबिराच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एक्सपर्टचे मालक विनायक लोकूर, माजी महापौर विजय मोरे आणि लॉज व्हिक्टोरियाचे अध्यक्ष समीर कुट्रे उपस्थित होते. आपल्या समयोचित भाषणात लोकूर यांनी रक्तदान केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात याची माहिती देऊन सुदृढ निरोगी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले. माजी महापौर मोरे यांनी यावेळी बोलताना एक्सपर्ट आणि लॉज व्हिक्टोरियातर्फे सालाबाद प्रमाणे आज आयोजित रक्तदान शिबिराची माहिती देऊन रक्तदानाचे महत्त्व विशद केले. रक्तदानामुळे अनेक गरजू लोकांचे प्राण आपण वाचवू शकतो हे लक्षात घेऊन नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
सदर शिबिरात एक्सपर्ट लॉन आणि लाॅज व्हिक्टोरियाच्या सदस्यांसह सुमारे 75 हून अधिक जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. केएलई हॉस्पिटल रक्तपेढीच्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाची प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडली. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी विनायक लोकूर, विजय मोरे व समीर कुट्रे यांच्यासह संतोष ममदापूर, केएलईचे पीआरओ सदानंद, सिद्धार्थ चंदगडकर, सौ. व श्री. तेजू नाईक, ॲलन मोरे आंबाप्रसाद नेर्लेकर, अभय कुलकर्णी, पार्थ संगोळ्ळी, अभिमान भालेराव, शिवकुमार पाटील, मेसाॅनिक हॉलच्या प्रमुख महिला अध्यक्ष नम्रता कुट्रे, रूपा लोकूर, आशा नाईक आदींनी परिश्रम घेतले. शेवटी संतोष ममदापूर यांनी सर्वांचे आभार मानले.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …