Wednesday , March 4 2026
Breaking News

केंद्रीय राज्य मंत्र्यांकडून हलगा प्राथमिक शाळेची पहाणी

Spread the love

बेळगाव : हलगा येथील प्राथमिक मराठी व कन्नड शाळेमधील अनेक विकासाचे विकासकामाची पाहणी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवार दिनांक 28 रोजी केली.
हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी यांनी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश, पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, माजी आमदार संजय पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन एच यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी मराठी व कन्नड शाळा परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंत, शाळेमधील बसवण्यात आलेले फेवर्स, शाळेचे मैदान, स्मार्ट क्लास, आधीची पाहणी केली. तसेच त्यांनी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल आढावा घेतला.

हलगा ग्रामपंचायत वाचनालयाची त्यांनी पाहणी करून या वाचनालयामध्ये असलेल्या सोयी बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी, ग्राम विकास अधिकारी विजयलक्ष्मी तेग्गी, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी, क्षेत्र शिक्षणाधिकारी आर. पी. जुट्टण्णावर, मराठी प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर. एस. मोरे, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक बी. एन. अलाबादी, ग्रामपंचायत सदस्य भुजंग सालगुडे, पिराजी जाधव,विलास परीट, तवनाप्पा पायाका, नजीर मुल्ला, सदस्या भारती पायाका, लक्ष्मी संताजी, रेखा चिकपरप्पा, मराठी शाळा सुधारणा समितीचे सदस्य बाळू कामती, अशोक पायाखा, कन्नड व मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *