मतदारसंघात पिण्याचे पाणी, रस्ता, शाळा इमारत, देवस्थान जीर्णोद्धार आदी कामे राबविली आहेत
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळेभावी येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विकासकामाचे स्थानिक लोकप्रतिनिधी व लक्ष्मीताई को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चन्नराज हट्टीहोळी यांनी भूमीपूजन केले.
सदर विकासकामासाठी एकूण 3.80 कोटी रुपये इतका खर्च येणार असून, नागरिकांना व रस्त्याला अडचण होऊ नये म्हणून काम हाती घ्यावे व वेळेत काम पूर्ण करण्याची सूचना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कंत्राटदाराला दिली आहे.
यावेळी बोलताना चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, संपूर्ण मतदारसंघात पिण्याचे पाणी, रस्ता, शाळा इमारत, देवस्थान जीर्णोद्धार आदी कामे राबविली आहेत. नैसर्गिक विकोपाणे अनेक ठिकाणी नुकसान झाले असताना, न खचता धैर्याने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कामे राबवित आहेत. लोकांचा आशीर्वाद, प्रोत्साहन व आशीर्वादाने मतदारसंघात हजारो कोटींचा निधी खेचून आणणे शक्य झाल्याचे सांगितले.
याप्रसंगी गावातील पंच, ग्राम पंचायत अध्यक्ष महेश, उपाध्यक्ष रत्नवा कोलकार, सदस्य बसनगौडा पाटील, नागय्या अर्जुन, कलाप्पा, दता बंडीगणी, मुरगेश इस्माईल तिगडी आदी उपस्थित होते.
*सोलार दीप उदघाटन*
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाळेकुंद्री के एच गावात चन्नराज हट्टीहोळी यांनी महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहून, पुतळ्यासमोर बसविलेल्या सोलार दीपचे उदघाटन केले.
यावेळी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर, सिदप्पा कांबळे, राकेश बुरुड, जैनुला कुडची, शहबाज शेख, शीतल जकनवर, प्रवीण मुरारी व इतर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta