Sunday , July 26 2026
Breaking News

घरगुती बाप्पांना आज निरोप, बेळगावात 29 फिरते विसर्जन कुंड

Spread the love

बेळगाव : घरगुती गौरी गणपतींचे आज मंगळवारी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी विसर्जन होत आहे. दरम्यान बेळगाव महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गौरी गणपती विसर्जनासाठी 29 फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पीओपी आणि रंगांमुळे तलावांचे पाणी प्रदूषित होऊ नये याची खबरदारी घेत, दरवर्षी फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून दिले जातात. यावर्षी मुर्ती विसर्जनासाठी भाग्यनगर पाचवा क्रॉस, पहिला रेल्वे गेट, टिळकवाडी गणेश चौक, जुना धारवाड रोड धाकोजी रुग्णालय जवळ, बसवेश्वर चौक खासबाग, सुभाष मार्केट हिंदवाडी, विश्वेश्वरय्या नगर बस स्टॉप, रामलिंग खिंड गल्ली टिळक चौक, कणबर्गी सिद्धेश्वर मंदिर मार्ग, देवराज अर्स कॉलनी, हिंडलगा झोपडपट्टी सुधारणा मंडळ कार्यालय, सह्याद्री नगर पाण्याची टाकी, रामतीर्थ नगर शिवालय, महांतेश नगर स्टेट बँक जवळ, बॉक्साइट रोड, हनुमान नगर, चन्नमानगर एसबीआय बँक जवळ, श्रीनगर उद्यान, साईबाबा मंदिर वंटमुरी, शाहूनगर अखेरचा बस स्टॉप, हरीमंदिर अनगोळ, याचबरोबर कॅम्प विभागात किल्ला परिसर, कॅम्प पोलीस ठाणे, लक्ष्मी टेकडी लक्ष्मी देवस्थान, इस्लामिया शाळा, जुने टपाल कार्यालय, कुमारस्वामी लेआउट, ऑटो नगर येथे विसर्जन कुंडची व्यवस्था करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *