बेळगाव : शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाची साथ वाढली आहे. त्यामुळे या साथीच्या आजारापासून नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 3 जुलै रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून येथील आनंदनगर वडगाव मधील शिवमंदिर येथे श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या उपस्थितीत लसीकरण कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.
तरी वडगाव भागातील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta