बेळगाव : “डॉक्टर्स डे” च्या निमित्ताने मराठा समाजाचे नेते तसेच कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव व विमल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण जाधव यांच्या हस्ते बेळगाव येथील प्रतिष्ठित डॉ. सुरेश रायकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. रायकर यांनी मागील 41 वर्षांपासून बेळगाव येथे रुग्णसेवा केली आहे. बेळगाव शहरात ते एक नावाजलेले डॉक्टर आहेत.
सदर कार्यक्रमास राजन जाधव, चैतन्य नंदगडकर, अभिषेक वेर्णेकर, अक्षय साळवी, अभिषेक मांडुलकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta