बेळगाव : पान उधारी देण्यास नकार दिल्याने पान दुकानदाराचा चाकूने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. वडगाव भागातील लक्ष्मीनगर येथे ही घटना घडली आहे. बाळकृष्ण नागेश शेट्टी (५०) रा.लक्ष्मीनगर असे मृत पान दुकानदाराचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय शिवानंद जंतिकट्टी रा.भारत नगर दुसरा क्रॉस याच्यावर शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय हा बाळकृष्ण शेट्टी यांच्या दुकानात पान आणि अन्य साहित्य घेण्यासाठी नेहमी जात असे. मंगळवारी रात्री देखील दत्तात्रय हा पान खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी पान त्याने उधारी मागितले. त्यावर पान दुकानदार बाळकृष्ण याने अगोदरची उधारी दे असे सांगून पान देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या दत्तात्रय याने आपल्याकडील चाकूने बाळकृष्ण याच्यावर सपासप वार केले. बाळकृष्ण याला उपचारासाठी नेण्यापूर्विच त्याचा मृत्यू झाला.
Belgaum Varta Belgaum Varta