Saturday , October 19 2024
Breaking News

जीएसटी विभागाच्या वतीने जीएसटी दिन साजरा

Spread the love

बेळगाव : जीएसटी करप्रणाली अंमलात येण्यापूर्वी दोन राज्यांतर्गत मालाची वाहतूक करताना अनेक समस्या येत होत्या. अवास्तव फॉर्म भरणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत होते. अशातच जीएसटी आल्यामुळे एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना अस्तित्वात आली. जीएसटीमुळे प्रत्येक राज्यात कर भरणे ही प्रक्रिया थांबल्याने मालाची वाहतूक 40 टक्क्मयानी वाढली आहे. ही करप्रणाली ग्राहकाभिमुख असल्याने अवघ्या 5 वर्षात ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकली, असे प्रतिपादन जीएसडब्ल्यू उद्योग समुहाच्या टॅक्स विभागाचे प्रमुख विनित अगरवाल यांनी केले.

शुक्रवारी बेळगाव जीएसटी विभागाच्या वतीने नेहरुनगर येथील केएलई शताब्दी सभागृहात जीएसटी दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर जे. एल. विंगचे कमांडर मेजर जनरल परमदीपसिंग बाजवा, केएलईचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, जीएसटी विभागाचे आयुक्त बसवराज नलगावे उपस्थित होते.

विनित अगरवाल म्हणाले, देशातील अनेक गावांमध्ये अद्यापही इंटरनेटची व्यवस्था नाही. त्यामुळे पूर्णपणे ऑनलाईन असणारी जीएसटी करप्रणालीची अंमलबजावणी कितपत होईल हे शासंक होते. परंतु केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रितपणे आलेल्या समस्यांवर तोडगा काढत जीएसटी करप्रणाली यशस्वी करून दाखविली. जीएसटीमुळे उद्योजक, व्यापाऱयांची डोकेदुखी कमी झाल्याचे त्यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले.

डॉ. विवेक सावजी यांनी जीएसटीचे विविध पैलू मांडत टेक्नॉलॉजीमुळे करप्रणालीमध्ये बदल होत असल्याचे सांगितले. आयुक्त बसवराज नलगावे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बेळगावसह इतर जिल्ह्यामधील उद्योजक, सीए, व्यापारी यांच्यासह इतर उपस्थित होते. सहआयुक्त डी. श्रीकांत यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *