बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. संजीव पाटील यांनी आज मावळते पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याकडून पदभार स्वीकारला.
चारच दिवसांपूर्वी डॉ. संजीव पाटील यांची बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली केल्याचा आदेश राज्य सरकारने बजावला होता. त्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून सूत्रे सोपविली. डॉ. संजीव पाटील यापूर्वी बेंगळूर पश्चिम विभागाचे डीसीपी म्हणून काम पहात होते. त्यांच्या जागी लक्ष्मण निंबरगी यांची बदली करण्यात आली असून ते उद्या बेंगळूर पश्चिम विभागाचे डीसीपी म्हणून सूत्रे स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta