बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात हलगा येथील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे.
सुदर्शन विजय पाटील (वय 22) रा. महावीरनगर हलगा बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर अपघात मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडला.
रहदारी दक्षिण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन हा मंगळवारी सायंकाळी बी. एस. येडीयुरप्पा मार्गावरून आपल्या दुचाकीसह हलग्याकडून जुने बेळगावच्या दिशेने येत होता. पावसात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गाडीसह दुभाजकाला जोराची धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून दक्षिण बेळगाव रहदारी पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.