Thursday , March 5 2026
Breaking News

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा शनिवारपासून

Spread the love

बेळगाव : जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 9 आणि 10 जुलै रोजी जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकच्या सभागृहात करण्यात आले आहे. 9 जुलै रोजी दुपारी 11.30 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 20 स्विस पद्धतीने होणार आहे.
खुल्या गटातील विजेत्याला अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार, 1,501, 1001, 801,701, 601रूपये तर 8,12 व 16 वर्षाखालील गटातील विजेत्यांना अनुक्रमे 1001, 501, 301, 201, 101 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तर 16 वर्षाखालील मुली व 55 वर्षांवरील वयस्करांसाठी 1001, 501 रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी निलेश भंडारी, गिरीश बाचीकर, आकाश मडीवाळ, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *