Saturday , September 21 2024
Breaking News

बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्यावतीने जिल्हा मर्यादित बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने कै. गंगाधरय्या एस. सालीमठ यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिल्या बेळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 व 10 जुलै 2022 असे दोन दिवस शिव बसव नगर, बेळगाव येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शनिवार दिनांक 9 जुलै रोजी दुपारी 1-30 वाजता स्पर्धेचा पहिला राऊंड सुरू केला जाणार आहे.
स्विस प्रकारात ही स्पर्धा घेतली जाणार असून 20 मिनिटे अधिक पाच सेकंद टाईम कंट्रोल मध्ये स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धा बेळगाव जिल्ह्यातील बुद्धीबळ पटूंसाठी मर्यादित आहे.
16 वर्षाखालील बुद्धिबळपटूंसाठी प्रवेश फी 150 रुपये तर खुल्या गटातील बुद्धिबळपटूंसाठी प्रवेश फी 250 रुपये आकारण्यात येणार आहे. आयोजन समितीच्यावतीने दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
खुल्या गटातील पहिल्या 10 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5001 रुपये, 3001 रुपये, 2001 रुपये, 1501 रुपये, 1501 रुपये, 1001 रुपये, 801 रुपये, 701 रुपये, 601 रुपये आणि 601 रुपये रोख तसेच या सर्व विजेत्यांना कप देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
8 वर्षांखालील, 12 वर्षाखालील आणि 16 वर्षां खालील वयोगटाकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतील पहिल्या 4 विजेत्यांना अनुक्रमे 101 रुपये आणि कप, 501 रुपये आणि कप, 301 रुपये आणि कप व 201 रुपये आणि कप तर पाचव्या क्रमांकाच्या विजेत्याला 201 रुपये आणि मेडल तसेच पाचव्या ते दहाव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट बुद्धिबळपटूंना प्रोत्साहनार्थ बक्षीस तसेच 16 वर्षांवरील उत्कृष्ट महिला बुद्धीबळ पटू आणि 55 वर्षांवरील जाणकार बुद्धिबळपटूला अनुक्रमे 1001 रुपये आणि कप व 501 रुपये आणि कप अशी बक्षिसे देऊन सन्मानित केले जाणार आहे.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या बुद्धिबळपटूंनी निलेश भंडारी, मोबाईल क्रमांक 8951045371 या क्रमांकावर प्रवेश शुल्क फोन पे करावयाचा आहे.
अधिक माहितीसाठी निलेश भंडारी मोबाईल क्रमांक 89510 45371, गिरीश बाचीकर, मोबाईल क्रमांक 80501 60834, आकाश मडिवाळर, मोबाईल क्रमांक 83102 59025, अथवा पवन शालगार, 99458 65403 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषा व रोजगाराच्या दिशा यावर उद्या चर्चा

Spread the love  बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय, बेळगाव येथे रविवारी (ता.२२) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *