बेळगाव : जुन्या पी. बी. रोड तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिरात देखील विशेष शक्ती असल्याचे मत सौन्दत्ती श्री रेणुका देवी मंदिराचे पुजारी के. एस. यडोरय्या यांनी व्यक्त केले.
गुरुवारी सकाळी त्यांनी बेळगाव तानाजी गल्ली श्री रेणुका देवी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक, महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिरात के. एस. यडोरय्या हे दिन नित्य पूजा पौराहित्य करत असतात. त्यांनी बेळगावातील रेणुका देवी मंदिरात विशेष पूजा केली.
बेळगावच्या रेणुका देवी ट्रष्ट कमिटीचे अध्यक्ष राहुल मुचंडी यांनी सौन्दत्ती मंदिराचे पुजारी यडोरय्या यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी यडोरय्या बेळगाव मंदिराच्या जिर्णोद्धार कामाची पाहणी केली. जुना पी. बी. रोड ब्रिजच्या खालील श्री रेणुका देवी मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम अनेक भाविकांकडून दिलेल्या मदतीतून सध्या जोरात सुरू आहे. यावेळी प्रकाश प्रभूंनावर, सुनील हलगेकर, रायनगडा पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta