बेळगाव : जुन्या पी. बी. रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरात गटारीचे सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन व्यवसाय -धंदे बंद पडल्याने निर्माण झालेल्या समस्याकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी आणि या परिसरातील नागरिकांसह दुकानदार, व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
जुन्या पी. बी. रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरातील दुकानदार आणि व्यावसायिकांनी आपल्या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. जोराच्या पावसामुळे जुन्या पी. बी. रोड येथील छ. शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरात गटाराचे पाणी तुंबून आसपासच्या परिसरात घरे, दुकाने, वर्कशॉप यामध्ये शिरले आहे. या ठिकाणच्या नाल्याचे बांधकाम व्यवस्थित झाले नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. असे म्हणणे मांडण्यात आले.
निवेदन सादर करतेवेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, उद्योजक शिवाजी हंगिरगेकर, सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी आदींसह बहुसंख्य दुकानदार, व्यापारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta