बेळगाव : डायनॅमिक शोटोकॉन कराटे डू इंडिया यांच्यावतीने नुकत्याच कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. चीफ इन्स्ट्रक्टर सिहान नागेश एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिवनगर बेळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. 150 हून अधिक कराटेपटूंनी या कराटे बेल्ट परीक्षेत भाग घेतला होता.
कराटे प्रशिक्षण घेणे ही आज काळाची गरज आहे. आजची सामाजिक स्थिती पाहता प्रत्येकाने कराटे प्रशिक्षण घेतले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलींना स्वसंरक्षणासाठी आवर्जून कराटेचे शिक्षण द्यावयास हवे, असे कराटे प्रशिक्षण नागेश पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
गौतमी उत्तम खन्नूकर आणि रिया टोप्पनावर यांनी या बेल्ट परीक्षेत ब्राऊन ब्लॅक बेल्ट मिळविला. 50 ते 60 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ब्राऊन बेल्ट, पर्पल बेल्ट आणि ब्ल्यू बेल्ट मिळविला. 45 विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण करीत यलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट आणि ग्रीन बेल्ट मिळविला.
बेल्ट प्रदान कार्यक्रमात बोलताना सिहान नागेश पाटील यांनी कराटे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूंचे कौतुक केले. या कराटेपटूंना पालकांचे प्रोत्साहन आणि कराटे प्रशिक्षकांचे चांगलेच मार्गदर्शन मिळाल्याने या कराटेपटूंनी उत्कृष्टरित्या कराटेचा सराव करून बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचेही नागेश पाटील यावेळी बोलताना म्हटले.
या यशस्वी कराटेपटूंना सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, सिहान नागेश पाटील, सेन्साई रोशनी मुळीक, सेन्साई करण पाटील, सेन्साई मितेश निलजकर, सेन्साई रश्मी पाटील, सेन्साई भावना गौंडवाडकर आणि सेन्साई भावेश्वरी गौंडवाडकर यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले आहे.
Check Also
दसरा उत्सवासाठी बेंगळुरू-बेळगाव स्पेशल ट्रेन
Spread the love बेंगळुरू : दसरा उत्सवाची पार्श्वभूमी दक्षिण पश्चिम रेल्वेने बंगळुरू, म्हैसूर, हुबळी, बेळगाव …