बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील करडीगुद्दी येथे पंचवीस लाखाच्या अनुदानातून बसवेश्वर मंदिर व समुदाय भवन बांधण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पहिल्या टप्प्यातील काही रक्कम समुदाय भावनासाठी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी मंदिर पंच कमितीकडे धनादेश स्वरूपात सुपूर्द केला आहे. यावेळी तालुका समितीचे माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील, करडीगुद्दी ग्रामपंचायत सदस्य श्री. सदाशिव तसेच पंच उपस्थित होते. दरम्यान यद्दलभावीहत्ती येथे बांधण्यात येणाऱ्या बसवेश्वर मंदिर व समुदाय भवनासाठी पहिल्या टप्प्यात 1,66,500 रुपये धनादेश स्वरूपात मंदिर पंच समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष मंदिराचे विश्वस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta