बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आज आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी खासदारांनी आवाज उठवून केंद्र सरकारकडे आपले प्रश्न मांडण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदारांना निवेदन दिले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज बेळगाव येथे आंदोलन केले. कामगारांना ग्रॅच्युइटी देण्यात यावी. केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवांचा विचार करावा. कामगारांच्या मानधनात वाढ करून त्यांचे वेतन निश्चित करावे, आम्हालाही किमान वेतन कायद्यांतर्गत सामावून घ्यावे, अशा मागण्यांचे निवेदन खासदार मंगला अंगडी यांना देण्यात आले.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर निदर्शने केली आणि आम्ही बेळगावच्या दोन्ही खासदारांना यावर आवाज उठवण्याचे आवाहन करत आहोत. हा मुद्दा त्यांनी पावसाळी अधिवेशनात मांडावा. अंगणवाडी सेविका आयसीडीएस योजनेत नमूद 6 मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. मात्र 1975 पासून शासन केवळ मानधनावरच आम्हाला राबवून घेत आहे. त्यामुळे किमान वेतन कायद्याखाली आणले पाहिजे. याद्वारे आम्ही खासदारांना किमान वेतन देण्याची विनंती करत आहोत, असे ते म्हणाले. या निदर्शनात बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सदस्य व इतरांनी भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta