280 बुद्धिबळपटूंनी घेतला होता स्पर्धेत भाग : ज्येष्ठ बुद्धिबळपटू गिरीश बाचीकर ठरले टूर्नामेंट चॅम्पियन
बेळगाव : नुकत्याच घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ज्येष्ठ बुद्धिबळपटू गिरीश बाचीकर हे टूर्नामेंट चॅम्पियन ठरले. स्पर्धेत साडेआठ पॉईंट घेऊन पहिला क्रमांक पटकावलेल्या गिरीश बाचीकर यांना 5001 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कै. गंगाधरय्या एस. सालीमठ यांच्या स्मृती प्रित्यर्थ बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आणि आर. एन. शेट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने खुल्या आणि विविध वयोगटात ही बेळगाव जिल्हा मर्यादित बुद्धिबळ स्पर्धा आयोजिण्यात आली होती. दिनांक 9 व 10 जुलै 2022 असे दोन दिवस शिव बसव नगर, बेळगाव येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहामध्ये स्विस पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत 280 बुद्धिबळपटू स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये 26 रेटेड प्लेयर्स (मानांकन मिळविलेले बुद्धिबळपटूं) चा समावेश होता. विशेष म्हणजे दहा अंध बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यापैकी दोघांनी बक्षिसे मिळविली. राजवीर बाचीकर हा पाच वर्षीय बुद्धिबळपटू या स्पर्धेचे आकर्षण ठरला होता. सोळा वर्षांवरील 15 महिला बुद्धीबळपटूंनीही यामध्ये भाग घेतला होता. अरबीट्रेटर (रेफ्री ) म्हणून करण परीट यांनी काम पाहिले.
स्पर्धेत खुल्या गटात गिरीश बाचीकर यांनी पहिला, श्रेयश ए. कुलकर्णी यांनी दुसरा तर आकाश जी. मडीवाळर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. तसेच दासरी दत्तात्रेय राव, राहुल भीमराव कांबळे, आदित्य ए. शेट्टी, मनोज हडपड, ररईस अहमद खान, प्रविण वाळवेकर व साहिल भट्ट यांनी अनुक्रमे चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा आणि दहावा क्रमांक पटकावला.
प्रकाश कुलकर्णी आणि व्यंकटेश कुलकर्णी यांना 55 वर्षांवरील जाणकार बुद्धीबळपटू तसेच संयुक्ता शजन्नवर, नेहा जी. पाटील व रचना अनगोळकर यांना 16 वर्षांवरील उत्कृष्ट महिला बुद्धीबळपटू म्हणून सन्मानित करण्यात आले.
वेदम चिक्कमठ, सारा कागवाड, तन्मयी पावले, एस. एम. परीक्षित, वेदांत थबाज, सिद्धांत थबाज, विपुल गौडा, अमोघ मरूर, दिव्यांश टी. व विराज कल्याणशेट्टी यांनी 8 वर्षांखालील वयोगटात अनुक्रमे पहिला ते दहावा क्रमांक मिळविला. 12 वर्षांखालील वयोगटात शिवनागराज ऐहोळी, राजस डहाळे, अनिरुद्ध दत्तात्रेयराव दासरी, रीतेश मुचंडीकर, नील परशुराम मंगनाईक, वैष्णवी व्ही, गीतेश सागेकर, श्योनार्क पाटील, याअद्वय सचिन मन्नोळकर व अद्वैत भट यांनी अनुक्रमे पहिला ते दहावा क्रमांक पटकावला.
श्रीकरा दरभा, साईप्रसाद खोकाटे, साई परशुराम मंगनाईक, गगन मुतगी, निधी दीपक कदम, प्रणव आनंदाचे, पियुष गायकवाड, निश्चल सखदेव, अतुल्य तसेच हर्ष कुलकर्णी यांनी 16 वर्षाखालील वयोगटात अनुक्रमे पहिला ते दहावा क्रमांक पटकाविला.
अथर्व मुंगरवाडी, राजवीर बाचीकर तसेच प्रज्वल नारळीकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.
खुल्या गटातील पहिल्या 10 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5001 रुपये, 3001 रुपये, 2001 रुपये, 1501 रुपये, 1501 रुपये, 1001 रुपये, 801 रुपये, 701 रुपये, 601 रुपये आणि 601 रुपये रोख तसेच या सर्व विजेत्यांना कप देऊन सन्मानीत करण्यात आले.
8 वर्षांखालील, 12 वर्षाखालील आणि 16 वर्षां खालील वयोगटाकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेतील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे 1001 रुपये आणि कप, 501 रुपये आणि कप, 301 रुपये आणि कप, 201 रुपये आणि कप व 201 रुपये आणि मेडल तसेच सहाव्या ते दहाव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट बुद्धिबळपटूंना प्रोत्साहनार्थ बक्षीस तसेच 16 वर्षांवरील उत्कृष्ट महिला बुद्धीबळ पटू आणि 55 वर्षांवरील जाणकार बुद्धिबळपटूला अनुक्रमे 1001 रुपये आणि कप व 501 रुपये आणि कप अशी बक्षिसे देऊन सन्मानित केले गेले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सालीमठ कुटुंबीय तसेच बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे संस्थापक सदस्य प्रकाश कुलकर्णी, बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश भंडारी, माजी अध्यक्ष सुरेश देसाई, उपाध्यक्ष डी. डी. राव, सचिव गिरीश बाचीकर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक कदम कुटुंबीय, नित्यानंद दरभा, सूत्रसंचालक पवन शालगार, सक्षम जाधव, श्रीमती स्वप्ना राव, आर्यन शेट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश पर्वतमठ यासह बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या इतर सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta