Friday , March 6 2026
Breaking News

बळ्ळारी नाल्याच्या पुराने भातपीकं धोक्यात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव परिसरातील दक्षिण भाग येळ्ळूर रोडपासून सुरु होणारा बळ्ळारी नाला शेतकर्‍यांना तारक असलेला 2013 पासून मारकच ठरलेला आहे. यातील गाळ, जलपर्णी काढून त्याची खोली वाढवल्यास तो तारक होईल. पण कर्नाटक सरकार, बेळगाव जिल्हा संबंधित अधिकारी, आमदार साहेबांना याबद्दल निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटून कल्पना देऊनही नाला स्वच्छ न झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यातच शेतकर्‍यांचा विरोध करून तयार केलेल्या हालगा-मच्छे बायपास परिसरातील पीकंसुध्दा पाण्यात बुडाल्याने दुसरा भुर्दंड पडला आहे.
गेल्या आठ दिवसापासून पडणार्‍या मुसळधार पावसाने बळ्ळारी बळ्ळारी नाला, बायपास परिसर पुराने बुडाल्याने पेरलेली भातपीकं वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट नक्कीच येणार असल्याने शेतकरी परत एकरी 40/50 हजार कुठून आणायचे? कारण गेल्यावर्षी तीबार पेरणी केली पण भाताला भाव नसल्याने नुकसान त्यातच रब्बी पीकंसुध्दा अवकाळी पावसाने गेल्याने मोठा आर्थिक भुर्दंड. शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. पुन्हा आता हे पुराचे संकट.
गेल्यावर्षी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बळ्ळारी नाला विकासासाठी 800 कोटीचा आराखडा मंजूर केला होता पण तो हवेतच विरल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसली हेच म्हणताहेत.
गेल्या दोन दिवसापासून पडणार्‍या मोठ्या पावसाने पुराची पातळी वाढतच आहे. त्यामळे शेतकरी आता भात रोप लावणी करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा याच विवंचनेत सापडले आहेत. त्यासाठी सरकारने ठोस पावल उचलून येथील शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज देऊन उभारी दिल्यास समाधान वाटेल तेसुद्धा देताना शेताच्या बांधावर जाऊन द्यावेत अन्यथा यातसुध्दा धन्यास कण्या, चोरास मलिदा अशीच परिस्थिती उद्भवेल.
आता बळ्ळारी नाल्याचे काम थांबले असलेतरी तुर्त पाण्याचा निचरा होण्यासाठी येळ्ळूर, यरमाळ, धामणे, जूनेबेळगाव-धामणे-बस्तवाड, येडियुराप्पा रोडच्या बाजूला जेसिबी, पोकल्याब लावून नाल्यातील गाळ, जलपर्णी काढल्यास थोडातरी पाण्याचा निचरा होईल आणि कांही प्रमाणात शेतकर्‍यांची पिकं वाचतील.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *