बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर विद्याभारती कर्नाटक यांच्या मान्यतेने संतमीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. सदर स्पर्धत 300हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, स्वामी विवेकानंद शाळेचे सचिव अॅड. चेतन मणेरीकर, क्रीडाभारती राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, विद्याभारती जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांचे सरस्वती ओमकार भारत माता फोटो पूजन व दिपप्रज्वलन करण्यात करण्यात आले.
शालेय खेळाडू अथर्व देमजी अभिजीत, सर्वेश देवेश माडकर, प्रियांका पाटील, सान्वी पाटील, सिद्धी लाटुकर, साई बसरीकट्टी या खेळाडूंनी मैदानावरती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांच्या सुपुर्द केली. स्वरा आंजनकर हिने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली, यानंतर उपस्थित पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन पर भाषण केले.
सदर स्पर्धेत संतमीरा इंग्रजी माध्यम शाळा, शांतिनिकेतन स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, देवेंद्र जीनगौडा स्कूल शिंदोळी, शाळेच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. याप्रसंगी क्रीडाशिक्षक अनुराधा पुरी, निरज सावंत, गौतम जयसिंग, धनाजी शंकर कोलकार, बापूसाहेब देसाई, ओमकार गावडे, मंजुळा तलवार, भाग्यश्री, यश पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta