Friday , March 6 2026
Breaking News

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या मानांकनात बिम्स 12व्या स्थानी!

Spread the love

बेळगाव : नुकत्याच प्रकाशित झालेल्या आऊटलूक मॅगझीननुसार सरकारी वैद्यकीय विद्यालयाच्या मानांकनात बिम्सचा क्रमांक 12 व्या स्थानी आहे. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेने या यादीत 12 वे स्थान मिळविल्याने जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जुलै 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या आऊटलूक या मस्कत देशातील सरकारी वैद्यकीय संस्थांचे रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. या यादीत बेळगाव जिल्हा वैद्यकीय शिक्षण संस्था 12 व्या स्थानी आहे. आऊटलूकच्या यादीनुसार बिम्स शैक्षणिक स्तरावर 8 व्या स्थानी, मूलभूत सुविधांमध्ये 12 व्या स्थानी, प्रशासन आणि प्रवेश यासंदर्भात 12 व्या स्थानी आहे.
नवी दिल्ली येथील एम्स, पुण्यातील एफएमसी, जीपमेर पॉण्डेचेरी संस्थांकडून मान्यताप्राप्त असलेल्या कर्नाटकातील बिम्स संस्थेसाठी हि अभिमानाची बाब आहे. बिम्स संस्था हि केवळ राज्यातच नाही तर देशात देखील अव्वल क्रमांकावर आहे, हि आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. या संस्थेसाठी काम करणारे वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी तसेच विशेष अधिकारी प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास यांनी ही संस्था उत्तम स्तरावर नेऊन ठेवली असून अशाचपद्धतीने संस्था प्रगतीपथावर आणण्यासाठी भविष्यात देखील सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *