Wednesday , December 10 2025
Breaking News

प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चटर्जी 17 जुलै रोजी बेळगावात

Spread the love

बेळगाव : डॉक्टर प्रकाश रायकर फाउंडेशन आणि तरंग म्युझिक अकादमी यांच्या वतीने बेळगावत आंतरराष्ट्रीय पद्मश्री पुरस्कार मिळालेले जागतिक कीर्तीचे कलाकार पंडित अनिंदो चटर्जी हे 17 जुलै रोजी रविवारी राणी पार्वती देवी कॉलेजच्या गिरी हॉलमध्ये बेळगावच्या तबला विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत, याचबरोबर संध्याकाळी 6.30 वाजता त्यांच्या या अद्वितीय कलेचे प्रात्यक्षिक प्रेक्षकांच्या समोर ते सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी बेळगावच नव्हेतर इतर शहर तसेच राज्यातील नावाजलेले कलाकार आणि विद्यार्थी सुद्धा उपस्थित राहणार आहेत, डॉक्टर रायकर फाउंडेशन हे खास कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गरीब मुलांना सुद्धा हे शिक्षण मिळण्यासाठी अमेरिकेच्या डॉक्टर प्रकाश रायकर यांनी बेळगावात व्यासपीठ तयार केलेले आहे. या व्यासपीठावर येणारे कलाकार, बालकलाकार ज्यांना कला शिकण्यासाठी स्कॉलरशिप या फाउंडेशनतर्फे दिली जाते आणि दरवर्षी सर्व मुलांपर्यंत खरी कला पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कलाकार फाउंडेशनतर्फे बेळगावात आणले जात आहेत. फाउंडेशनतर्फे मागील वर्षात पंडित जयंतीर्थ मेहुंडी पंडित आदित्य कल्याणपूर असे मोठे दिग्गज आपली कला सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवून गेलेले आहेत आणि यावर्षी सगळ्या कलाकारात शेवटचे टोक मानले जाणारे किंवा महर्षी समजले जाणारे तालरीशी पंडित अनिंदो चटर्जी बेळगावकरांना भेटायला येत आहेत याचा सर्व बालकलाकारांनी तसेच श्रोत्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
सर्व रसिकांसाठी हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता खुला आहे, ज्या मुलांना तबला कार्यशाळेत सकाळच्या सत्रात भाग घ्यायचा असेल तर त्यांनी डॉक्टर प्रकाश रायकर फाउंडेशनचे संचालक विशाल मोडक 9483070834 यांना संपर्क करावा, अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. प्रकाश रायकर (अमेरिका) यांनी दिली. पत्रकार परिषदेला तरंग तबला अकादमीचे विशाल मोडक, समीरा मोडक आणि सौ. मैथिली आपटे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष; सुवर्णसौधला भाजपचा घेराव घालण्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत भाजप नेत्यांनी प्रचंड निदर्शने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *