बेळगाव : मुतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी म. ए. समितीची सत्ता कायम राहिली असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर समर्थक किरण पाटील हे ग्रामपंचायत अध्यक्षपदीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात किरण पाटील यांचे स्वागत केले. शिवाय समितीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव देखील केला.
किरण पाटील विजयी होताच समितीचे कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत होते. विशेषतः संतोष मंडलिक, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, मयूर बसरीकट्टी, मुतग्याचे सुनील अष्टेकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण कणबरकर, सुधीर पाटील व इतर समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
Belgaum Varta Belgaum Varta