बेळगाव : बेळगावमधील सदाशिवनगर भागातील क्रॉसवरील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने या परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत असतो. यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सदाशिवनगरच्या शेवटच्या क्रॉसवर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची नादुरुस्ती कायमची डोकेदुखी बनली आहे. पावसाळ्यात देखील या भागातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीतरीत्या मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात नवा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे मात्र यासाठी दोन ते तीन महिने वेळ लागणार असल्याचे हेस्कॉम अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात हेस्कॉम अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार येथील नागरिक करत आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले बोलताना म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात हि समस्या याठिकाणी उद्भवते. प्रत्येकवेळी ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यात येते. मात्र आपल्या भागात सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही. याठिकाणी नवा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, आणि हि समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी हेस्कॉम अधिकार्यांकडे केली आहे.
स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असलेल्या बेळगावमधील प्रमुख भागात अद्यापही अनेक मूलभूत सुविधा योग्यपद्धतीने पोहोचल्या नसल्याचे यावरून दिसून येते.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …