कोल्हापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांकरिता अपारंपारीक स्वरुपाचे शिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि लोकविकास केंद्र यांच्या अंतर्गत कौशल्य व उद्योजकता प्रमाणपत्र पत्र अभ्यासक्रम केंद्र शिनोळी येथील वसंत विद्यालय येथे सुरु झाले असून अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नावनोंदणी करावी असे आवाहन शिवाजी विद्यापीठाने केले आहे. या केंद्राच्या वतीने सध्या पाच अभ्यासक्रम सुरु होत असून यामध्ये काजू प्रक्रिया उद्योग व विक्री, बटाटा व रताळी प्रक्रिया उद्योग व विक्री, टॅली, ट्रॅव्हल्स अॅन्ड टुरिझम, ड्रेस डिझायनिंग यांचा समावेश आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी वसंत विद्यालय शिनोळी येथिल कार्यालयात संपर्क करुन या संधीचा लाभ घ्यावा असे शिवाजी विद्यापीठाने कळविले आहे.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …