बेळगाव : आषाढी एकादशीची पंढरपूर वारी संपवून वारकरी गावामध्ये आल्यानंतर दहीकाला कार्यक्रम आयोजित केला जातो. ही दहीहंडी गावातील हक्कदार यांच्या घरातून वाजत गाजत श्रीहरी विठ्ठलाच्या जयघोषात आनंदाने श्री चांगळेश्वरी मंदिरकडे आणले जाते व मंदिरसमोर सर्वांच्या उपस्थित दहीकाला हंडी मानाच्या लाकडाच्या ओडक्याला बाधून सभोवती फिरवली जाते व गावातील नागरिकांच्यावतीने दहीहंडी फोडली जाते व सर्वांना तिर्थप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. गावातील सर्व वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.