बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात दुर्मिळ रानमांजर आढळल्याने खळबळ माजली आहे. वन खात्याच्या अधिकार्यांनी त्याला ताब्यात घेऊन जंगलात सोडले.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात काल, रविवारी रात्री रानमांजर सदृश्य प्राणी आढळल्याने खळबळ माजली आहे. काही स्थानिक रहिवाशांनी त्याला बिबट्याचे पिल्लू असल्याचे म्हटले. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, याची माहिती मिळताच वन खात्याच्या तज्ज्ञ अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर हे रानमांजर असल्याचे जाहीर केले. त्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. भारतात रानमांजर अतिशय दुर्मिळ प्राणी आहे. काल रात्री महादेव होन्नोळी या शेतकर्याच्या शेतातील कोंबड्यांच्या पिंजर्यात ते सापडले होते. याची माहिती मिळताच वन खात्याच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन रानमांजर ताब्यात घेऊन त्याला पुन्हा जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. दरम्यान, हे दुर्मिळ रानमांजर पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.