Thursday , December 11 2025
Breaking News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचा अधिकारग्रहण उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ बेळगावात उत्साहात पार पडला.
बेळगावातील मंडोळी रोडवरील गॅलॅक्सी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष रवी हत्तरगी, सचिव अमित पाटील, कोषाध्यक्ष भरतेश पाटील आदी पदाधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला.
गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. रवींद्र यांनी स्वागत केले. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांनी क्लबच्या नव्या कार्यकारिणीला शपथ देऊन पदांची सूत्रे प्रदान केली. नूतन अध्यक्ष रवींद्र हत्तरगी यांनी नव्या वर्षात राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती देऊन सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांनी रोटरी क्लबतर्फे जगभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, सर्वानी रोटरी क्लबचे सदस्य व्हावे असे आवाहन केले. यावेळी रोटरी क्लबचे जनसंपर्क संचालक दामोदर लोहार यांच्यासह पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

Spread the love  बेळगाव : सिमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन आणि शिवकालीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *