Saturday , October 19 2024
Breaking News

जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे यश : ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील

Spread the love

 

जे. के. फाऊंडेशन, दमशि मंडळ बी. के. कॉलेज माजी विद्यार्थी संघटना, प्रगतिशील- एल्गार परिषदतर्फे मार्गदर्शन शिबिर, व्याख्यानाचे आयोजन

बेळगांव : जीवनात जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे यश संपादन करता येते किंवा आपण मिळवू शकतो हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. अनेक संकटांना मात करून पुढे जाण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्पर्धात्मक काळात टिकायचे असेल तर अभ्यास केला पाहिजे. एखादे ध्येय गाठायचे असेल तर मनात कोणत्याच प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिक प्रयत्न, कार्यातील सातत्य कायम राखले पाहिजे, खडतर अभ्यासाची साधना व तपश्चर्या करायला हवी. अनेक विविध प्रकारांचे वाईट प्रवृत्तींना बाजूला सारून पुढे जायला हवे. आधुनिक तंत्रज्ञानात नवे बदल घडत आहेत; समूह माध्यमांचा योग्य तो वापर केला गेला पाहिजेत आणि स्वतःवरच नियंत्रण ठेवून यशस्वी वाटचाल करायला हवी. ज्ञान हे शस्त्रापेक्षाही धारधार आहे; अज्ञानाना गाढून काढण्यासाठी ज्ञान खूप महत्वाचे कार्य करते; ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन दमशि मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत श्री. आर. वाय. पाटील यांनी “आधुनिक काळात स्पर्धात्मक परीक्षेचे महत्व : आपली जबाबदारी आणि उपाय योजना एक चिंतन” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बेळगांव येथील जे. के. फाऊंडेशन, जनकल्याण फाउंडेशन, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद, एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धात्मक परीक्षा” मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बेळगांव येथील रामदेव गल्ली कार पार्किंग जवळील गिरीष कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात गुरुवार दिनांक 21 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मोफत मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दमशि मंडळ माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत श्री. आर. वाय. पाटील होते.

प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली येथील ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षणतज्ञ प्रा प्रसून दुबे व प्रा. संदिप मिश्रा उपस्थित होते.

व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती. एल. एन. शिंदे, मुख्याध्यापक एम.के.पाटील, प्रा. नारायण पाटील, प्रा. निलेश शिंदे, जी. व्हि. पाटील, बी. एम. पाटील , रोहन कुंडेकर उपस्थित होते.

स्वागत प्रा. नारायण पाटील, प्रास्ताविक प्रा. निलेश शिंदे, तर परिचय सचिव आप्पाजी गाडेकर व प्रसाद पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचलन रोहन कुंडेकर यांनी तर भरत वर्पे यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली येथील ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षणतज्ञ प्रा प्रसून दुबे व प्रा. संदिप मिश्रा यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरीता मौलिक विचार मांडून मार्गदर्शन केले.

यावेळी अनिल पाटील, अर्जुन सांगावकर, गायत्री गोनबरे, प्रविण देसाई, दत्ता कुंडेकर, सुजित मोदगेकर, सागर गुंजिकर, सुधीर लोहार, शेखर कोळजीगावडा, प्रतीक्षा चौगुले, सृष्टी चव्हाण, पुनम लोहार, श्रद्धा गुऱ्यापंनवर, गौतमी लाटूकर, रोहित पाटील, कल्लाप्पा तिक्के तसेच व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक सरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *