बेळगाव : काँग्रेसमध्ये खुर्चीवरून सुरु असलेल्या घमासान वरून विजापूरमध्ये मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसमध्ये खुर्चीवरून अंतर्गत मतभेद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आतापासूनच सुरु आहे. मात्र राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार नाही, असा टोला उमेश कत्ती यांनी लगावलाय. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार हे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. मुख्यमंत्री पदासाठी त्यांची मोठी आकांक्षा आहे. मात्र त्यांची हि आशा निवडणुकीपर्यंत आधीच राहूदे असा टोलाही त्यांनी लगावलाय. भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, हे भविष्य आहे. भाजप योग्य शासन चालवत आहे. त्यामुळे पुढील काळात देखील राज्यात भाजपाचीच सत्ता येईल, असा विश्वास उमेश कत्ती यांनी व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta