बेळगाव : नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यात पेरणी केली होती. भातपिक जोमाने आले होते मात्र बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे संपूर्ण भातपिक नष्ट झाले आहे. तसेच लावणीसाठी टाकलेली तरू देखील कुजलेले आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र दुबार पेरणी करून देखिल भातपिक पुन्हा नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
बळ्ळारी नाला परिसरातील 1 किलोमीटर परिसरातील भातपिक दरवर्षीच पाण्याखाली जाते, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. बळ्ळारी नाल्यामध्ये गाळ साचल्यामुळे नाल्याचा तळ आणि शेतजमीन सारखाच झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे या परिसरातील शेतजमीन पाण्याखाली जाते. तरी शासनाने संबंधित खात्याने तसेच लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta