Thursday , June 4 2026
Breaking News

सहकारी संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

बेळगाव : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा प्रतिवर्षी गौरव करून प्रोत्साहन देणारी ग्रामीण भागातील ही सोसायटी अभिनंदनाला पात्र आहे, असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोज पावशे यांनी सुळगा (हिं) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आयोजिण्यात आला होता याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक चेअरमन अशोक पाटील होते. ब्रह्मलिंग हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन मनोज पावशे यांच्या हस्ते, बेळगाव बारचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण व मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी अतिवाडकर यांनी प्रज्वलन केले. बेळगाव ट्रॅफिक पोलीस स्टेशनचे एएसआय मंगल पाटील व निवृत्त मुख्याध्यापक मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
सुळगा व बेनकनहळी येथील सातवी व दहावीत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये रूपाली कदम, सुकन्या चलवेटकर, गायत्री पाटील, नारायण कलखांबकर, आदित्य पाटील, शुक्ला गडकरी, सानिका कलखांबकर, आशुतोष देसुरकर, प्रतीक्षा पाटील, पूजा सुतार, सोमेश्वरी कातकर, सौभाग्य येल्लूर, पूर्वा मंडलिक व कुस्तीपटू शीतल पाटील यांचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
स्वागत संस्थेचे व्हाईस चेअरमन बसवंत बेनके यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार प्रकाश बेळगुंदकर यांनी तर आभार मॅनेजर एन. वाय. चौगुले यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *