बेळगाव : मराठीचा पोटशूळ असलेल्या कांही समाजकंटकांनी श्री गणेश विसर्जनाच्या धामधुमीचा गैरफायदा घेऊन तानाजी गल्ली समर्थनगर येथील ज्येष्ठ पंच मंडळ व भगवा रक्षक युवक मंडळाचे मराठीतील माहिती फलक उखडून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव शहरातील समर्थनगर येथील प्रभाग क्रमांक 15 मधील तानाजी गल्लीच्या कोपर्यावर असलेले भगवा रक्षक युवक मंडळ आणि ज्येष्ठ पंच मंडळाचे माहिती फलक काल रविवारी रात्री तीनच्या सुमारास उखडून टाकण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
श्री गणेश विसर्जनाच्या धामधुमीचा गैरफायदा घेऊन समाजकंटकांनी सदर फलक उखडून भिंतीआड झुडपात फेकून दिले होते. हा प्रकार उघडकीस येताच तानाजी गल्ली परिसरात एकच खळबळ उडवून संतापाची लाट पसरली. मराठीचा पोटशूळ असणार्या कडून हे निंद्य कृत्य केले दिले असल्याने याचा तीव्र धिक्कार करण्यात आला.
यासंदर्भात तानाजी गल्ली येथील पंच मंडळींनी आज तातडीची बैठक बोलावली असून सदर बैठकीत माहिती फलक उखडून टाकण्याच्या कृती विरोधात कोणते पाऊल उचलायचे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विघ्नसंतोषी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अलीकडे बेळगाव शहरात भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे.
यापूर्वी सुळगा -येळ्ळूर येथील दिशादर्शक फलक उखडून टाकण्याचा प्रकार कन्नड समाजकंटकांनी होता. गेल्या कांही महिन्यांपासून या-ना त्या प्रकारे मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असून यासंदर्भात पोलीस खाते मात्र हातावर हात ठेवून गप्प बसत असल्यामुळे तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
तानाजी गल्ली समर्थनगर येथील मराठीतील फलक उखडून टाकण्याचा प्रकार समाजात असंतोष निर्माण करण्यास या उद्देशानेच केला गेला आहे. तेंव्हा संबंधित समाजकंटकांना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कडक शासन करावे, अशी मागणी केली जात आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …