बेळगाव : तरुणीचा फोटो वापरून बनावट फेसबुक अकाउंट उघडून तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला बेळगाव पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले.
महांतेश मूडसे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने एम. स्नेहा नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. तो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील नाईहिंग्लज गावचा रहिवासी आहे. त्याने पीएसआयची शारीरिक चाचणी उत्तीर्ण केली होती. धारवाडमध्ये राहून परीक्षेची तयारी करत असलेल्या महांतेश याने तरुणीच्या नावाने पैसे गोळा केले आणि आनंद लुटण्यासाठी तो गोव्याला गेला. त्याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर बेळगावच्या तरुणीचे फोटो टाकले होते. ते तिच्या फेसबुक अकाउंटवरून डाऊनलोड करण्यात आले होते. त्याने तीन वर्षांपूर्वी बनावट अकाऊंट उघडून २० लाख रुपये उकळले. तो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तरुणांशी मैत्री करायचा आणि स्नेहा असल्याचे भासवून नंबर मिळवायचा. मग तो फोनवर गप्पा मारायचा. नंतर पैशांची गरज असल्याचे भासवून 10, 20, 50 हजारांपर्यंत पैसे मागायचा. पैशांची गरज संपली की नंबर ब्लॉक करायचा.
पण जेव्हा मूळ तरूणीला हा सर्व प्रकार समजला तिने त्वरित सीईएन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सीईएन पोलिसांनी गोव्यात जाऊन त्या तरूणाला ताब्यात घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta