बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद यांची जयंती रविवार दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता साजरी करण्यात येणार आहे. यावेळी वक्ते म्हणून ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्रा. संजय बंड उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे राहातील. गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रगतिशील लेखक संघ बेळगावतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta