बेळगाव : शहापूर स्मशाभूमीत अंत्यविधीच्या वेळी चक्क एका वानराने हजेरी लावली. इतकेच नव्हे तर ते वानर भावुक देखील झाले.
हिंदू धर्मात वानराला बजरंगबली मारुतीरायचे प्रतिरूप मानले जाते. आज शनिवार आणि मृत व्यक्तीचे नाव देखील मारुती असल्यामुळे शहापूर स्मशानभूमीत घडलेला प्रकार चांगलाच चर्चेत आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी की, जोशी गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक मारुती (भाऊ) सखाराम कडगावकर (वय 65) यांचे काल रात्री निधन झाले. आज सकाळी शहापूर स्मशानभूमीत मारुती यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी आणण्यात आले. आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मयत मारुती यांचे शवदाहिनीजवळ नेताच एक वानर या ठिकाणी आले. प्रारंभी उपस्थितांनी या वानराकडे दुर्लक्ष केले. काहींनी त्याला हुसकवण्याचा देखील प्रयत्न केला मात्र हे वानर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणलेल्या लाकडांवर बसून राहिले. इतकेच नाही तर त्याने मयत मारुती यांच्या मृतदेहाला स्पर्श देखील केला आणि हे वानर भावुक झाल्याचे उपस्थितांतून बोलले जात आहे.
शनिवारचा दिवस मृत व्यक्तीचे नाव मारुती आणि त्यांच्या अंत्यविधीला चक्क वानरराजची उपस्थिती हा एक दैवी योगायोग आहे, अशी चर्चा उपस्थितांतून केली जात आहे. वानरराज चिता रचून पूर्ण होईपर्यंत दाहिनीवर बसून होते आणि अंत्यसंस्काराचे सोपस्कार करण्याच्या कृतीकडे न
बारकाईने पाहत होते.
Belgaum Varta Belgaum Varta