Tuesday , June 2 2026
Breaking News

बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष माळू मजुकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Spread the love

 

बेळगाव : बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष माळू मजुकर काँग्रेस पक्षात प्रवेश केले आहेत. हिंडलगा येथे युवा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी आयोजित “युथ जोडो बुथ जोडो” कार्यक्रमात माळू मजूकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस शाल घालुन पक्षात स्वागत करून घेतले. माळू मजुकर हे महाराष्ट्र एकीकरण समितीत होते.
यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, तरुणांनी संघटित होऊन क्रियाशीलपणे बुथ पातळीवर पक्ष मजबूत करावे. राजकारणात परिवर्तन घडविण्यास तरुण पिढीची भूमिका फार महत्त्वाची आहे. देशात तरुणांनी परिश्रम घेतल्यास देश उच्चस्थानी जातो, असे सांगितले.
यावेळी भारतीय युवा काँग्रेसचे प्रधान कार्यदर्शी बंटी शेळके, माजी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, मनोहर बेळगावकर, सातेरी बेळवटकर, बागना नरोटी, चित्रे, महेश कोलकार, मल्लेश चौगुले, अशोक कांबळे, बाळू देसुरकर, वेंकट पाटील, अजित कदम, यलाप्पा ढेकोळकर, जयराम पाटील, मारुती बेळगांवकर, गजानन काकतकर, नारायण नलवडे, मल्लिकार्जुन लोकूर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *