Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेलीची नीता किड्सला भेट

Spread the love

 

बेळगाव : प्राइड सहेलीच्या सेक्रेटरी जिग्ना शहा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त नीता किड्समध्ये छोट्या मुलांच्या rhymes अँड स्टोरी टेलिंगच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. नीता किड्स वर्ल्डमध्ये साधारण 30 छोटी मुले आहेत. या मुलांच्यातील कलागुणांना समोर आणण्यासाठी या स्पर्धा अध्यक्ष आरती शहा यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर छोट्या मुलांनी rhymes म्हणून दाखवल्या. त्याचबरोबर काही मुलांनी स्टोरी सांगितल्या. त्यानंतर मुलांना
जिग्ना शहा यांच्यातर्फे चॉकलेट केक्स आणि गिफ्ट देण्यात आले. नीता किड्स संचालिका नीता खंडोजी यांनी शाळेबद्दलची माहिती दिली. या कार्यक्रमाला पवन राज पुरोहित, श्रुती मेहता, मंदालसा चौगुले, अश्विनी रोकडे, रूपा मंगावती इत्यादी सदस्या उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *